मुंबई – भाजपाचे माजी आमदार थोड्याच वेळात राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
धुळ्याचे भाजपचे माजी आमदार अनिल गोटे आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
आज शरद पवारांचा वाढदिवस असून हेच औचित्य साधत अनिल गोटे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मुंबईत दुपारी 12.30 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून ते शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना झाले आहेत.
त्याचबरोबर शिरपूरमधील भाजपचे जितेंद्र ठाकूर यांनी याआधीच राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित केला आहे. तेही आज गोटेंसोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
दरम्यान अनिल गोटे यांनी एप्रिल महिन्यात पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. धुळे महानगरपालिका निवडणुकीपासून गोटे यांनी स्वपक्षाविरोधात आणि भामरे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. नंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली होती. त्याचवेळी ते भाजपा सोडतील, असे बोलले जात होते. अखेर त्यांनी एप्रिलमध्ये पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
COMMENTS