नवी दिल्ली – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. रवींद्र आंग्रे यांच्या काँग्रेसमधील प्रवेशानंतर राजस्थानमध्ये भाजपला धक्का बसला आहे. भाजप आमदार श्रीकृष्ण गुप्ता यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.श्रीकृष्ण गुप्ता यांनी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरला होता. भाजपकडून त्यांना तिकीट मिळेल अशी आशा होती. परंतु भाजपने त्यांच्याऐवजी दुसऱ्या उमेदवाराला तिकीट दिल्यामुळे त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत गुप्ता यांना शिवसेनेनं उमेदवारी देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे याठिकाणी भाजपला मोठा धक्का बसला असल्याचं दिसत आहे.
COMMENTS