मुंबई – राज्यात सत्तास्थापन करण्याबाबत भाजपाच्या एका वरिष्ठ मंत्र्याने मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपाला अजूनही शिवसेना सरकारमध्ये सहभागी होईल अशी अपेक्षा आहे. परंतु शिवसेनेने सहकार्य केले नाही तर पाठिंब्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा करु असं या मंत्र्यांनं म्हटलं असल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडियाने छापली आहे. या मंत्र्याचं नाव मात्र जाहीर करण्यात आलं नाही. त्यामुळे हा मंत्री कोण याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान विश्वासदर्शक ठराव जिंकण्याचा विश्वास नसेल तर भाजपा सत्ता स्थापनेसाठी दावा करणार नाही असेही या मंत्र्याने म्हटले आहे. आमच्याकडे नंबर नाही हे आम्हाला माहित आहे. शिवसेना आमच्यासोबत येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला मदत केली होती. तशाच प्रकारच्या मदतीसाठी आम्ही राष्ट्रवादीशी चर्चा करु शकतो असे या मंत्र्याने सांगितले आहे. तसेच शिवसेनेच्या मागण्या आम्हाला अव्यवहार्य वाटतात असंही या मंत्र्यानं म्हटलं असल्याची माहिती आहे.
COMMENTS