मुंबई – भाजपचा ज्येष्ठ नेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या बाजूने मैदानात उतरला असून त्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा निषेध केला आहे.
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले
ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी पडळकर यांच्यावर टीका केली आहे. मी भाजपात असलो तरी अनेक वर्ष शरद पवारांसोबत काम केलं आहे. टीका करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या वयाचे भान ठेवावे.
अशी जोरदार टीका पिचड यांनी पत्रक काढून केली आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीपूर्वी पिचड यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मधुकर पिचड पवारांसोबत राहिले. 35 वर्ष त्यांनी अकोले मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांना सतत मंत्रिपदही मिळालं होतं. पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी भाजपमध्ये प्रवेश करतोय, पण शरद पवार यांचे उपकार कधीही विसरणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता भाजपमध्ये असूनही त्यांनी पवारांची बाजू घेतली आहे.
COMMENTS