नवी दिल्ली – भाजप नेत्यानं माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला असल्याची प्रतिक्रिया पीडित महिलेनं दिली आहे. उत्तराखंडमधील भाजपा नेते संजय कुमार यांच्यावर महिलेनं आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वीरच लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे संजय कुमार यांना पदावरुन हटवण्यात आलं आहे. त्यानंतर या महिलेनं आपली प्रतिक्रिया दिली आहे. संजय कुमार मला अश्लील छायाचित्र पाठवायचा, काही वेळा त्याने कार्यालयातच माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. दोन वेळा त्याने माझे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. संजय कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या महिलेने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान मी भाजपाची कार्यकर्ता आहे. मी मूळची दिल्लीची असून २००६ पासून मी उत्तराखंडमध्ये डेहराडून येथे राहते. मी डेहराडूनच्या भाजपा कार्यालयात डेटा एंट्रीचे काम करायचे. याच सुमारास संजय कुमार यांच्याशी ओळख झाली. ‘फेब्रुवारीमध्ये माझ्याकडे पक्षासाठी आलेल्या धनादेशांच्या डेटा एंट्रीचे काम देण्यात आले.
मी यासाठी दररोज पक्ष कार्यालयात जायचे. कार्यालयात संजय कुमार माझ्याकडे पाहून अश्लील शेरेबाजी करायचे. किमान दोन वेळा त्यांनी कार्यालयातच चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. ते इंटरनेटवरुन डाऊनलोड केलेले अश्लील छायाचित्र मला पाठवायचे. कधी कधी स्वत:चेही फोटो त्यांनी पाठवले. पण हे फोटो अवघ्या काही सेकदांमध्ये डिलीट केले जायचे असा खुलासा देखील या महिलेने केला आहे.
COMMENTS