कणकवलीत राणेंना धक्का, ‘या’ नेत्याचा शिवसेनेच्या सावंत यांना पाठिंबा! VIDEO

कणकवलीत राणेंना धक्का, ‘या’ नेत्याचा शिवसेनेच्या सावंत यांना पाठिंबा! VIDEO

कणकवली – शिवसेनेचा तीव्र विरोध असतानाही भाजपने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांना पक्षात प्रवेश देऊन कणकवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना-भाजप युतीत वादाची ठिणगी पडली आहे. कारण भाजपा-शिवसेनेची युती असताना शिवसेनेने स्वतःचा उमेदवार नितेश राणेंविरोधात मैदानात उतरवला.  शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नितेश राणे विरुद्ध सतीश सावंत असा सामना रंगणार आहे.

परंतु अशातच आता नितेश राणे यांना धक्का बसला आहे. कारण भाजपचे बंडखाेर संदेश पारकर यांनी माघार घेत शिवसेनेच्या सतीश सावंत यांना दिला पाठिंबा आहे. सतीश सावंत हेच खरे महायुतीचे उमेदवार असल्याचे वक्तव्य पारकर यांनी केले आहे. नितेश राणे महायुतीचे उमेदवार नसल्यानं सतीश सावंतांच्या पाठिशी राहणार असल्याची संदेश पारकरांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे. त्यामुळे याठिकाणी खा. विनायक राऊत यांच्या शिष्टाईला यश आलं असल्याची चर्चा आहे.

दरम्यान सतीश सावंत हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. नारायण राणे यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले सावंत काही दिवसांपूर्वीच राणेंची साथ सोडून शिवसेनेत आले आहेत. नितेश यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला होता. सतीश सावंत यांना कणकवली ग्रामीण भागातून मोठे समर्थन आहे. जिल्हा परिषदेच्या हरकुळ बुद्रुक गटातून त्यांनी सलग तीनवेळा विजय मिळवला आहे. अशातच आता पारकर यांनीही त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच गाजणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS