मुंबई – आगामी निवडणुकांमध्ये युती करण्याबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता भाजपचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाणार प्रकल्पाच्या मुद्यावरुन ते भेट घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्या मोतोश्री भेटीकडे लक्ष लागलं आहे.
दरम्यान नाणार रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे, त्यावर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. सौदी अरमाको एड्नोप, रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमीकल रिफानरी या करारासंदर्भात धर्मेंद्र प्रधान हे चर्चा करणार आहेत. या भेटीत नाणार प्रकल्पाच्या चांगल्या बाबी, महाष्ट्राच्या विकास, नाणार महत्वाचे मुद्दे यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे.
त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्या भेटीनंतर तरी शिवसेना नाणार प्रकल्पाला पाठिंबा देणार का याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS