…पण खडसेंचा वणवास संपवा, ज्येष्ठ नेत्यांचा अमित शाहांकडे आग्रह !

…पण खडसेंचा वणवास संपवा, ज्येष्ठ नेत्यांचा अमित शाहांकडे आग्रह !

नवी दिल्ली – भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी एकनाथ खडसेंसाठी आग्रह केला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा विचार व्हावा, मंत्रिमंडळात समावेश शक्य नसल्यास खडसे यांना पक्षसंघटनेत तरी मोठी जबाबदारी द्यावी, पण खडसे यांचा वनवास संपवावा, पक्षासाठीही ते चांगले होईल अशी मागणी वरिष्ठ नेत्यांनी अमित शाह यांच्याकडे केली आहे.

लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे संकते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणे एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार का याबाबत चर्चा रंगली आहे. अशातच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे एकनाथ खडसे यांना खूश करण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात येईल किंवा त्यांना भाजपचं प्रदेशाध्यक्षपद दिलं जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांना मंत्रिमंडळात घेण्याबाबत हिरवा कंदील दाखवला नसल्याचं दिसत आहे. परंतु खडसेंसाठी भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे आग्रह धरला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ खडसे यांचा विचार व्हावा, मंत्रिमंडळात समावेश शक्य नसल्यास खडसे यांना पक्षसंघटनेत तरी मोठी जबाबदारी द्यावी, पण खडसे यांचा वनवास संपवावा, पक्षासाठीही ते चांगले होईल अशी मागणी वरिष्ठ नेत्यांनी अमित शाह यांच्याकडे केली आहे. त्यामुळे अमित शाह हे एकनाथ खडसे यांचा राजकीय वणवास संपवतील का याकडे लक्ष लागलं आहे.

 

 

COMMENTS