एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार, काय म्हणाले भाजप नेते, वाचा चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया!

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार, काय म्हणाले भाजप नेते, वाचा चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया!

मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला रामराम केला असून ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करणार आहेत. याबाबतची घोषणा राष्ट्रावादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. शुक्रवारी त्यांचा प्रवेश होईल असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. खडसेंवर भाजपमध्ये अन्याय झाला आहे, एकनाथ खडसे पक्षात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार असल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांचा राजीनामा आला आहे, त्यांना शुभेच्छा आहेत. चर्चेतून मार्ग काढण्याचे प्रयत्न झाला, पण त्यांनी अखेर राजीनामा दिला. राजीनामा पाठवला आहे तर स्विकारला जाईल असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

तर एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला असून त्यांची समजूत काढण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. परंतु त्यांनी अखेर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खडसे यांनी ज्या पक्षात जातील तिथे चांगलं काम करावं. त्यांना आमच्या शुभेच्छा असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील खडसे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मला एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याची अधिकृत माहिती नाही. अधिकृतरित्या राजीनामा दिल्याचे कळल्यावरच मी यावर बोलेन. आमचे अध्यक्ष हे आधीच खडसेंसोबत बोलत आहेत, तेच याबद्द्ल सांगू शकतील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

COMMENTS