पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर भाजपकडून ‘यांना’ उमेदवारी जाहीर !

पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर भाजपकडून ‘यांना’ उमेदवारी जाहीर !

मुंबई – भाजपचे दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या जागेवर ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांना भाजपनं उमेदवारी जाहीर केली आहे. अडसड हे धामणगाव रेल्वे मतदारसंघातील भाजपाचे माजी आमदार आणि वैधानिक विकास महामंडळचे माजी अध्यक्ष आहेत.

अरुण अडसड

दरम्यान पांडूरंग फुंडकर यांची २०१४ साली विधान परिषदेवर निवड झाली होती. विधानसभेच्या आमदारांद्वारे विधान परिषदेवर निवडून दिल्या जाणाऱ्या आमदारांच्या कोटय़ातील ही जागा असून भाजपचा झेंडा पश्चिम विदर्भात फडकवीत ठेवणारे नेते म्हणून अडसड यांचे पक्षात स्थान आहे. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका ते लढले.  ते दोनदा चांदूर (रेल्वे) मतदारसंघातून विजयी झाले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याऐवजी दुसरा चेहरा देण्याचा व अडसडांना अन्य जबाबदारीत सामावून घेण्याचा प्रस्ताव अडसडांनी नाकारला होता. पण मोदी लाटेत व खुद्द मोदींची सभा चांदूरात होऊनही त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

दरम्यान १९९५ मध्ये युतीची सत्ता असताना पराभव होऊनही अडसडांना विदर्भ वैधानिक मंडळाचे अध्यक्षपद देऊन सन्मानित करण्यात आले होते. मात्र तेव्हापासून राजकारणात व पक्षातही काहीसे बाजूला पडलेल्या अडसडांचा ज्येष्ठ निष्ठावंत म्हणून विचार सुरू झाला आहे.

COMMENTS