नवी दिल्ली – मागील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत भाजपनं 282 जागांवर विजय मिळवला होता. परंतु त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट ओसरत चालली असल्याचं दिसत आहे. कारण लोकसभेतील भाजपजच्या 282 जागांचा आकडा थेट 172 वर जाऊन पोहचला आहे. 2014 नंतर 30 ठिकाणी लोकसभेच्या पोटनिवडणुका झाल्या. यातील 16 जागा भाजपच्या होत्या. 16 जागांपैकी भाजपनं अवघ्या 6 जागांवर विजय मिळवला आहे तर 10 जागांवर भाजपला पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 282 पोहोचलेली भाजप चार वर्षात 272 वर पोहोचली आहे.
दरम्यान कर्नाटकात आज तीन लोकसभा आणि दोन विधानसभेच्या जागांसाठीच्या पोटनिवडणुकांचा निकाल लागला. यामध्ये भाजपला फटका बसला असून काँग्रेस-जेडीएसने आपलं वर्चस्व राखलं आहे. तीन पैकी केवळ लोकसभेच्या एकाच जागेवर भाजप जिंकली तर अन्य दोन जागांवर काँग्रेस जेडीएसने बाजी मारली. भाजपच्या लोकसभेतील या घसरणीमुळे 2019मध्ये भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे.
COMMENTS