भाजपला 242 जागा मिळतील, मनमोहन सिंग यांच्या माजी माध्यम सल्लागाराचा अंदाज !

भाजपला 242 जागा मिळतील, मनमोहन सिंग यांच्या माजी माध्यम सल्लागाराचा अंदाज !

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत भाजपला 242 जागा मिळतील असा अंदाज मनमोहन सिंग यांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू यांनी व्यक्त केला आहे.
नरेंद्र मोदी हे नॅशनल ब्रॅण्ड आहेत. अशी प्रतिमा तयार करण्यात अजुनी अन्य कुणाला नेत्याला यश आलं नाही. राहुल गांधी यांना सुद्धा अशी प्रतिमा निर्माण करण्यात यश आलं नाही. दक्षिणेत प्रादेशिक पक्षांचं वर्चस्व आहे. मात्र इतर भागात मोदी अजुनही ब्रॅण्ड आहेत. त्याचा फायदा भाजपला मिळणार असल्याचंही बारु यांनी म्हटलं आहे

दरम्यान  2014 मध्ये जी लाट होती तशी लाट सध्या नाही. त्यामुळे तसं यशही मिळणं अवघड आहे. परंतु भाजप सरकार स्थापन करण्यात यशस्वी होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच या निवडणुकीत सगळ्यात मोठा पक्ष भाजपच राहणार असून त्यांना 242 जागा मिळतील असा अंदाज त्यांमी वर्तवला आहे. एका व.त्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

COMMENTS