भाजपला आणखी एक धक्का, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राष्ट्रवादीच्या वाटेवर, पवारांची घेतली भेट!

भाजपला आणखी एक धक्का, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राष्ट्रवादीच्या वाटेवर, पवारांची घेतली भेट!

पंढरपूर – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला आणखी एक धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण भाजपशी संलग्न असलेले सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे  हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.  संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी अजित पवारही उपस्थित होते.शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर संजय शिंदे यांची भेट महत्त्वाची समजली जाते. संजय शिंदे हे पालकमंत्री गटाचे नेते असून सहकारमंत्र्यानी नुकतंच त्याना पवारांचा प्रचार करायचा असेल तर भाजपमुळे मिळालेली पदं सोडण्याचा इशारा दिला होता. यानंतर संजय शिंदे यांनी पवारांची भेट घेतल्याने ते लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा सुरु आहे.

COMMENTS