लोकसभेसाठी भाजपची पहिली यादी, 100 जणांच्या यादीत राज्यातील 7 नेत्यांना उमेदवारी?

लोकसभेसाठी भाजपची पहिली यादी, 100 जणांच्या यादीत राज्यातील 7 नेत्यांना उमेदवारी?

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या संसदीय समितीची आज बैठक होत आहे. या बैठकीनंतर भाजप आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याची माहिती आहे. या यादीत 100 नेत्यांची नावं असून राज्यातील 7 नेत्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली असल्याची माहिती आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, सदानंद गौडा यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान वारासणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: निवडणूक लढण्याची औपचारिक घोषणा करु शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. तर भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील 7 नावांचा समावेश जवळपास निश्चित मानला जात आहे. यामध्ये नागपूरमधून नितीन गडकरी , चंद्रपूर – हंसराज अहिर, गडचिरोली-चिमूर – अशोक नेते, भंडारा – गोंदिया – परिणय फुके किंवा रचना गहाणे,  वर्धा – रामदास तडस, जालना – रावसाहेब दानवे, बीड – प्रीतम मुंडे यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS