नवी दिल्ली – लोकसभेचा निकाल येत्या 23 तारखेला लागणार आहे. परंतु निकालापूर्वीच भाजपमध्ये उत्साहाचं वातावरण पहायला मिळत आहे. कारण जवळपास सर्वच ‘एक्झिट पोल’मध्ये भाजप आणि एनडीएला बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर NDAमधल्या सर्व घटकपक्षांची बैठक नवी दिल्लीत बोलावण्यात आली असून 21 मे रोजी ही बैठक पार पडणार आहे.
दरम्यान एक्झिट पोल पाहून विरोधकांच्या हालचाली मंदावल्या असल्याचं दिसत आहे.
परंतु एनडीएतल्या नेत्यांच्या हालचालींना मात्र वेग आला आहे.याच पार्श्वभूमीवर 21 मे रोजी सर्व मित्र पक्षांच्या नेत्यांची दिल्लीत बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत पुढच्या रणनीतीवर चर्चा करण्यात येणार आहे.त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.
सीव्होटर (CVoter) आणि रिपब्लिक टीव्हीचा (RepublicExitPoll) एक्झीट पोल
लोकसभा एकूण जागा 543
भाजप + मित्रपक्ष = 305
काँग्रेस + मित्रपक्ष = 124
सपा-बसपा = 26
इतर = 87
COMMENTS