मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणूक माढ्यातून लढवणार आहेत. त्यामुळे शरद पवारांविरोधात भाजपकडून कोण निवडणूक लढवणार याबाबत चर्चा सुरु होती. परंतु भाजपनं सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना उमेदवारी दिली असल्याची माहिती आहे. रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांनी माढ्यातून निवडणूक लढवण्यास नकार दिला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी माढ्यातून लढण्यास तयार दर्शवली आहे.
दरम्यान 2009 च्या लोकसभा निवडणुकीत सुभाष देशमुख आणि शरद पवार यांच्यात थेट लढत झाली होती. त्यावेळी सुभाष देशमुख यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता. त्यानंतर 2014 ला भाजप सरकार राज्यात सत्तेत आल्यावर सुभाष देशमुख यांची ताकद वाढली असून त्यांनी सहकारमंत्री म्हणून राज्यात काम पाहिले आहे. त्यानंतर ते आता शरद पवार यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांविरोधात पुन्हा निवडणूक लढणार आहेत, त्यामुळे या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS