मुंबई – सत्तेच्या शिकारीसाठी सर्व लांडगे एकत्र येत आहेत, पण भाजप ही सिंहाची पार्टी असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. भारतीय जनता पक्षाच्या 38 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलत असताना त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी तिसऱ्या आघाडीची चाचपणी करणाऱ्या विरोधकांना टोला लगावला आहे. सत्तेच्या शिकारीसाठी हे सर्व लांगडे एकत्र येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही चिमटा काढला आहे. ज्यांची दुकानदारी मोदींनी बंद केली, असे सगळे बेरोजगार एकत्रित येऊन मोदींविरोधात लढण्याचा विचार करत आहेत. शिकार दिसली की लांडगे कसे एकत्रित येतात, तसेच सगळे लांडगे आता सत्तेच्या शिकारीसाठी एकत्र येत आहेत. पण काळजी करु नका, भाजप ही सिंहाची पार्टी असून याआधी कितीही लांडगे आले ते सिंहाशी लढू शकणार नाहीत. मोदींसारखा सिंह आज आमच्याजवळ असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे.
COMMENTS