6 एप्रिलच्या महामेळाव्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी !

6 एप्रिलच्या महामेळाव्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी !

मुंबई आगामी निवडणुकांसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये भाजपचं जोरदार शक्तीप्रदर्शन पहायला मिळणार आहे. 6 एप्रिलला भाजपचा स्थापना दिवस आहे. या स्थापना दिवसानिमित्त वांद्रे-कुर्ला संकुलात भाजपने महामेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासह राज्यासह देशभरातून सुमारे 4 लाख कार्यकर्त्यांची फौज मुंबईत दाखल होणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे या महामेळाव्यासाठी सध्या जोरदार तयारी सुरु झाली आहे.

दरम्यान 6 एप्रिल 1980 मध्ये भाजपाची स्थापना दिल्लीत झाली होती. त्यावेळी पहिले अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी हे होते. सध्या भाजपाला 38 वर्ष झाली असून पक्ष आज गावागावात पोहचला आहे. या राज्यात 91400 बूथ असून त्यापैकी 83 हजार बुथ गठीत केले आहेत. तसेच एका बुथवर 25 कार्यकर्ते अशी रचना पक्षाने राज्यात केली असून राज्यात पक्षाने 1 कोटी सदस्य केले आहेत. एका विधानसभेत ३०० ते ३२५ बुथ असून हिशोब लावला तर 7 हजार 5०० कार्यकर्ते एका विधानसभेत आहेत. या सर्व कार्यकर्त्यांना निमंत्रित केलं असून यासाठी 28 रेल्वे गाड्या, 50 हजार बस आणि इतर खाजगी गाड्यांनी कार्यकर्ते मुंबईत येणार आहेत. या कार्यकर्त्यांची व्यवस्था मुंबई भाजपाने केली असून 3 लाख कार्यकर्ते राज्यभरातून येतील त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यासाठी मोठा मंडप टाकला असून आमदार, खासदार आणि मंत्र्यांसाठी बसण्याची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.

 कार्यक्रमाचं स्वरुप

– 5 तारखेला संध्याकाळी अमित शाह मुंबई विमानतळावर येतील

– विमानतळ ते बीकेसीपर्यंत बाईक रॅलीने अमित शाह यांची स्वागत मिरवणूक काढली जाणार

– रात्री कोअर कमिटीची बैठक होईल

– 6 एप्रिलला 11.30 वाजता सभा सुरू होईल

– संध्याकाळी 4.30 वाजता अमित शहा यांची पत्रकार परिषद होण्याची शक्यता

– संध्याकाळी 6 वाजता MCA क्लबमध्ये सर्व खासदार, आमदारांची अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक

COMMENTS