2004च्या निवडणुकीसारखी पुनरावृत्ती होऊ नये, भाजपच्या मंत्र्यांना चिंता !

2004च्या निवडणुकीसारखी पुनरावृत्ती होऊ नये, भाजपच्या मंत्र्यांना चिंता !

मुंबई – बुद्धिजीवी चर्चा खूप करतात, मात्र अनेक जण मत देत नाहीत असे विधान करत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी 2004च्या निवडणुकीची आठवण कार्यकर्त्यांना आणि बुद्धिजीवी वर्गाला आपल्या भाषणात करून दिली. त्यावेळी प्रत्येक व्यक्ती बोलत होते.अटल बिहारी वाजपेयीच पंतप्रधान होणार. परंतु या निवडणुकीत भाजपला फटका बसला. कल्याणमध्ये भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी आयोजित केलेल्या बुद्धिजीवी संमेलनात ते बोलत होते. या संमेलनात कल्याणमधील बुद्धिजीवी वर्गापेक्षा भाजपचेच कार्यकर्ते जास्त होते.

दरम्यान मनोज सिन्हा यांच्या या वक्तव्यामुळे भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांना पुन्हा आपली सत्ता येईल याची खात्री नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

COMMENTS