कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपचा मोठा निर्णय?

कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपचा मोठा निर्णय?

मुंबई – शिवसेना सरकार स्थापन करत असेल तर भाजप विरोधी पक्षात बसणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात सत्तास्थापनेबद्दल आज भाजप कोअर कमिटीची बैठक पार पडली.
या बैठकीत हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. तसेच या बैठकीत अपक्षांची काही जुळवाजुळव होते का यासंदर्भात चर्चा झाली. बैठकीनंतर अमित शाह यांच्याशी संपर्क साधून सर्व माहिती त्यांना देण्यात आली. भाजपची सध्याची स्थिती पाहता अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन होणे शक्य नाही. त्यामुळे शिवसेना सरकार बनवत असेल, तर भाजपची विरोधी पक्षात बसायची मानसिकता झाली असल्याची माहिती आहे.

दरम्यान भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे राज्यपालांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे भाजपला आता बहूमत सिध्द करावे लागणार आहे. परंतु अपक्ष आमदारांच्या मदतीनही भाजपला ते शक्य होणार नाही. तसेच या पार्शिवभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मालाडमधील हॉटेल द रिट्रीटमध्ये जाऊन शिवसेना आमदारांची भेट घेतली. राज्यात आपलच सरकार बनणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत शिवसैनिकाला बसवणार असल्याचा शब्द उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांना दिल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेना सरकार स्थापन करत असेल तर भाजप विरोधी पक्षात बसणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

COMMENTS