मुंबई – राज्याचं लक्ष लागलेली भाजपची कोअर कमिटीची बैठक संपली असून यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांच्या भेटीला गेले असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपला स्वबळावर बहुमत मिळालं नसल्याने आता त्यांच्याकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात येतो की नाही, याबाबतची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागली आहे. या बैठकीला भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे, आशिष शेलार, गिरीश महाजन, व्ही सतीश, विजय पुराणिक उपस्थित होते.
दरम्यान भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत सत्तास्थापनेबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार होता. त्यामुळे हा निर्णय घेऊनच मुख्यमंत्री फडणवीस राज्यपालांच्या भेटीला गेले असल्याची माहिती आहे. या भेटीत भाजपकडून सत्तास्थापनेचा दावा न केल्यास दोन नंबरचा पक्ष असलेला शिवसेना सत्ता स्थापनेसाठी पुढाकार घेऊ शकतो. त्यामुळे आगामी राजकीय हालचालींकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS