भाजप संसदीय समितीची बैठक उद्या, भाजपची पहिली यादी जाहीर होणार?

भाजप संसदीय समितीची बैठक उद्या, भाजपची पहिली यादी जाहीर होणार?

मुंबई – भाजप संसदीय समितीची बैठक उद्या दिल्लीत येथे पार पडणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या दिल्लीत जाणार आहेत. या बैठकीत जागांबाबत
शिक्कामोर्तब झाल्यावर उद्या रात्री उशिरा भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच भाजपच्या या बैठकीनंतर शिवसेना-भाजपची युतीचीही घोषणा केली जाणार असल्याचंही बोललं जात आहे.

दरम्यान दोन जिवसांपूर्वीच भाजपच्या कोअर कमेटीची  बैठक पार पडली होती. दिल्लीतल्या भाजपच्या मुख्यालयात ही बैठक झाली. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,  कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, बी. एल. संतोष, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, मंगल प्रभात लोढा, व्ही. सतीश, राज्य संघटक विजय पुराणिक, आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत जवळपास 112 उमेदवारांच्या नावांवर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. उद्या होणाय्रा या बैठकीत ही यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना-भाजप युतीबाबत मोठ वक्तव्य केलं आहे. 288 मतदारसंघातील इच्छुकांना इथं बाेलवलंय. म्हणजे युती हाेणार नाही असं नाही.न्याय हक्कासाठी लढल्यावरच लाेक सत्ता देतात. अमित शहा यांच्यासाेबत चर्चा झाली आहे. काेण कुठं जिंकणार, यावरून दाेघांत जागा ठरतायत असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी युतीचे संकेत दिले आहेत. ते आज मुंबईत घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

दरम्यान सगळ्यां इच्छुकांचा आदर करताे. प्रत्येकाशी एकेकट्याला भेटलाे. 288 ची तयारी झालीय, आता २०१४ राहिलेले नाही. सत्ता पाहिजे असेल तर खेचाखेची करून चालणार नाही. जागावाटप आज उद्या हाेईल. काही जागा अंतिम व्हायच्या आहेत. लाेकसभा निवडणुकीपूर्वी मी यू टर्न मारला. माझ्या शिवसैनिकांचा माझ्यावर विश्वास आहे. मला बंडखाेरी चालणार नाही. जागावाटप झाल्यावर फालतुपणा चालणार नाही, गद्दारी करायची नाही.भाजपच्या जागांबाबतही हेच करायचं आहे. तसेच विधानसभेवर भगवा फडकवूया, दाेन दिवसांत युतीचे जाहीर हाेईल असे संकेतही उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

COMMENTS