नवी दिल्ली – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं कंबर कसली असून सध्या भाजपच्या बैठकांवर बैठका सुरु आहेत. कालच पंतप्रधान मोदी यांनी भाजपच्या सर्व खासदारांसोबत बैठक घेतली होती. त्यानंतर आज राजधानी दिल्लीतील ६, दीनदयाळ मार्गावरील मुख्यालयात ही बैठक पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला भाजपची सत्ता असलेल्या १५ राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान तसेच 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि या वर्षाच्या अखेरीस पार पडणा-या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात येत आहे. या बैठकीत अमित शहा हे २०१९च्या निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. यात विविध भागातील प्रचार, एनडीए आघाडी, पक्ष संघटन याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
COMMENTS