कोकणातील लोकसभा मतदारसंघांसाठी भाजपची महत्त्वाची बैठक!

कोकणातील लोकसभा मतदारसंघांसाठी भाजपची महत्त्वाची बैठक!

रायगड – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं हालचाली सुरु केल्या आहेत. कोकण मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आज कोकणात भाजपनं महत्त्वाची बैठक बोलावली आहे. पनवेल येथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. मावळ, रायगड, रत्नागिरी सिद्धूदुर्ग लोकसभा आढावा बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीला भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी सरोज पांडये,भाजपा प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपाचे स्थानिक आमदार, स्थानिक पदाधिकार, जिल्हा अध्यक्ष यांच्या उपस्थिती आहे.

दरम्यान आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा शिवसेनेनं केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे संबंध दुरावले असल्याचं पहावयास मिळालं आहे. परंतु गेली काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्रित येतील अशी चर्चा सुरु आहे. कारण दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर आले होते. त्यावेळी दोघांनीही एकमेकांची पाठराखण केली होती. त्यामुळे शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्रित येतील असं बोललं जात आहे. शिवेसना- भाजपा युतीचे नगारे वाजत असनाच आज भाजपने कोकणातील लोकसभा मतदारसंघातील आढावा बैठक पनवेल येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना
, भाजप युतीची पुन्हा चर्चा रंगली आहे.

COMMENTS