मुंबईतल्या भाजपच्या बैठकीला शिवसेना आमदाराची  हजेरी !

मुंबईतल्या भाजपच्या बैठकीला शिवसेना आमदाराची हजेरी !

मुंबई – भाजपच्या आमदार, खासदारांची आज मुंबईत बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी या बैठकीत आमदार आणि खासदारांसोबत चर्चा केली. भाजपचे बहुतेक खासदार आणि आमदार या बैठकीला उपस्थित होते. मात्र एका शिवसेनेच्या आमदारानेही या बैठकीला हजरी लावली. नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेच्या तिकीटावर निवडूण आलेले आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी या बैठकीला हजेरी लावली. प्रताप पाटील चिखलीकर सध्या तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेत असले तरी मनानं ते केंव्हाच भाजपवासी झाले आहेत.

नांदेड महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारीही भाजपनं चिखलीकरांकडे दिली होती. मात्र त्यात त्यांना फारसं यश आलं नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या लोहा नगर पालिकेच्या निवडणुकीत मात्र त्यांनी भाजपला घवघवीत यश मिळवून दिलं. 2014 च्या निवडणुकीनंतर चिखलीकरांनी भाजपची कूस धरली आहे. त्यामुळे ते आज ना उद्या भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहेच. आज उघडपणे त्यांनी भाजपच्या बैठकीला हजेरी लावल्यामुळे आता चिखलीकरांचा भाजप प्रवेश लवकरच होईल अशी चर्चा सुरू झाली आहे.

COMMENTS