‘त्या’ भाजपच्या नेत्याला निवडणूक आयोगाकडून दणका !

‘त्या’ भाजपच्या नेत्याला निवडणूक आयोगाकडून दणका !

नवी दिल्ली – भाजपच्या नेत्याला निवडणूक आयोगानं दणका दिला आहे. छत्तीसगडमध्ये मतदानापूर्वी ईव्हीएम मशीनची पूजा केल्यामुळे भाजपाचे मंत्री दयाल दास बघेल यांना निवडणूक आयोगानं दणका दिला आहे. मशीनची पुजा केल्यामुळे कारणे दाखवा नोटीस निवडणूक आयोगानं बजावली आहे. ‘मतदानापूर्वी ईव्हीएमची पूजा करतानाची बाब आमच्या निदर्शनास आली आहे. या प्रकरणी भाजपाचे उमेदवार बघेल यांना नोटीस पाठवण्यात आली असून त्यांच्याकडून उत्तर आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी सुब्रत साहू यांनी म्हटलं आहे.

दरम्यान छत्तीसगड विधानसभा निवडणुकांमध्ये शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी बघेल यांनी ईव्हीएम मशीनची चक्क विधीवत पूजा केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी पूजा झाल्यानंतर नारळ फोडलं आणि त्यानंतरच आपलं मत नोंदवलं होतं. त्यामुळे निवडणूक आयोगानं त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

 

COMMENTS