भाजप मंत्र्यांची दाढी कटिंग करायची नाही !

भाजप मंत्र्यांची दाढी कटिंग करायची नाही !

यवतमाळ –  भाजप मंत्री, खासदार, आमदार यांची दाढी, कटिंग करायची नाही, असा निर्णय यवतमाळमधील नाभिक संघटनेने घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वातावरण तापण्याची चिन्हं आहेत.

“ ज्या प्रकारे न्हावी 3-4 गिऱ्हाईक असतील तर अर्धी-अर्धी हजामत करतात त्याप्रमाणे काँग्रेसने ठेकेदाराला मलई देऊन कामं अर्धवट ठेवली होती.” असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं.

मुख्यमंत्र्यांच्या  या  वक्तव्यावरून नाभिक समाज नाराज आहे. नाभिक समाज प्रामाणिकपणे काम करून उदरनिर्वाह करतो, असं नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय नक्षणे यांनी सांगितलं.

 

COMMENTS