मुंबई – नाशिकमध्ये भाजपला धक्का बसला असून भाजपचे विद्यमान आमदार अपूर्व हिरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आहे. नाशिक जिल्ह्यातील भाजपच्या प्रशांत हिरे, अपूर्व हिरे आणि अद्वैत हिरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अपूर्व हिरे यांनी प्रवेश केला आहे.
माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्यासह अपूर्व हिरे आणि कुटुंबियांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. @PawarSpeaks यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पक्षप्रवेश केला. #NCP #पक्षप्रवेश pic.twitter.com/2S0iwhL8I1
— NCP (@NCPspeaks) December 7, 2018
दरम्यान राष्ट्रवादीत येण्यासाठी अनेक नेते उत्सुक आहेत, येणा-या काळात असे प्रवेश होत राहतील असे संकते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहेत. तसेच मध्यंतरीच्या काळात काही गैरसमज निर्माण झाले, तो दुरावा मिटलाय. नाशिकच्या राजकारणात हिरे कुटुंबियांना योग्य ते स्थान दिले जाणार असल्याचं यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
आज आनंदाचा दिवस आहे. हिरे कुटुंबीय परत एकदा त्यांच्या पूर्वीच्या घरात येत आहेत. या कुटुंबाला इतिहास आहे. भाऊसाहेब हिरे राज्याच्या इतिहासात प्रसिद्ध आहेत. कूळ कायदा त्यांनी आणला. असे हे कुटुंब आज राष्ट्रवादी काँग्रेसला शक्ती द्यायला आले आहे. – @ChhaganCBhujbal #NCP #पक्षप्रवेश pic.twitter.com/sUoZWbsJrL
— NCP (@NCPspeaks) December 7, 2018
COMMENTS