महिला पोलिसाच्या विनयभंगाप्रकरणी भाजपच्या विद्यमान आमदाराला अटक!

महिला पोलिसाच्या विनयभंगाप्रकरणी भाजपच्या विद्यमान आमदाराला अटक!

भंडारा – तुमसर विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार चरन वाघमारे यांना अटक करण्यात आली आहे. तुमसर पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस उप निरीक्षक यांचा विनयभंगाप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक, यांनी 18 सेप्टेंबरला वाघमारे यांच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन 354 कलम अन्वये वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना आज विद्यमान आमदार चरण वाघमारे यांना भंडारा पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान पोलिसांनी आमदार आणि शहराध्यक्षाविरुद्ध कलम 353, 354, 472, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला होता. याबाबत आज वाघमारे यांना अटक केल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

काय आहे प्रकरण ?

तुमसर बाजार समितीमध्ये हा प्रकार घडला होता. भाजपकडून कामगारांच्या सुरक्षा किट वाटपाचे काम 16 सप्टेंबर 2018 ला रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यावेळी उपस्थित भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांनी महिला अधिकाऱ्याला असभ्य भाषेचा उपयोग केला असल्याची तक्रार आहे. जिभकाटे यांनी त्यांच्याशी भांडण सुरू करत त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर आमदार चरण वाघमारे देखील तेथे आले. त्यांनीही महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.
अनिल जिभकाटे यांनी महिला अधिकाऱ्याचा हात पकडून धक्काही दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

COMMENTS