भाजप 25 विद्यमान आमदारांचे तिकीट कापणार ?

भाजप 25 विद्यमान आमदारांचे तिकीट कापणार ?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप जवळपास 25 विद्यमान आमदारांचे तिकीट कापणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्थानिक राजकारण, जनसंपर्काचा अभाव, सरकारच्या कामांची अंमलबजावणी न करणं या विविध निकषांवर 25 आमदारांचं तिकीट कापलं जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे जसजशी निवडणुकीची तारीख जवळ येत आहे तसतशी या आमदारांमधील धाकधूक वाढत असल्याचं दिसत आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीचा पॅटर्न भाजप विधानसभा निवडणुकीतही वापरणार असल्याचं दिसत आहे. कारण लोकसभा निवडणुकीत भाजपने महाराष्ट्रात प्रभावी कामगिरी नसणाऱ्या तब्बल 8 खासदारांचं तिकीट कापलं होतं. लोकसभा निवडणुकीत भाजपने केलेली ही खेळी यशस्वी झाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही भाजप लोकसभेतील याच पॅटर्नचा आधार घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे कोणाचं तिकीट कापलं जाणार याबाबतची धाकधूक आता भाजप आमदारांमध्ये वाढली असल्ृाचं दिसत आहे.

COMMENTS