भाजपला मोठा धक्का, 12 आमदारांसह काही ज्येष्ठ नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत?

भाजपला मोठा धक्का, 12 आमदारांसह काही ज्येष्ठ नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत?

मुंबई – निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये मोठी भरती झाली होती. परंतु राज्यात आता भाजपमध्ये मोठी गळती होणार असल्याचं दिसत आहे. कारण पक्षातील 12 आमदारांसह काही नेते पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले नेते पुन्हा जाण्याच्या तयारीत आहेत. इतकच नाही तर भाजपामधील काही नाराज नेतेही इतर पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान या 12 आमदारांबरोबरच राज्यसभेतील एका खासदारानेही राजीनामा देऊन महाविकास आघाडीबरोबर येत पोटनिवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती आहे.जर एकाच वेळी 12 आमदारांनी राजीनामा देऊ केला तर त्याचा मोठा परिणाम भाजपवर होणार आहे.

दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी तर कालच आपली नाराजी थेट माध्यमांसमोर व्यक्त केली होती. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. या सगळ्या घडामोडीनंतर आता भाजपला आणि राज्यातील भाजपचे दिग्गज नेते फडणवीस यांना अतिशय मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

COMMENTS