मुंबई – लातूरमधील औसा मतदारसंघाचे
भाजप आमदार अभिमन्यू पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह त्यांच्या मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याबाबत स्वतः अभिमन्यू पवार यांनी ही माहिती दिली आहे. अभिमन्यू पवार यांच्या घशात खवखव होत होती. ही कोरोनाची लक्षणं असल्यानं त्यांनी कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. चाचणीनंतर ते कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
आशिर्वाद असू द्या पाठीशी
मला हलकासा ताप/खोकला जाणवत असल्याने मी व माझ्या कुटुंबीयांनी कोरोना चाचणी केलेली.मी व माझा मुलगा परिक्षीत आम्हा दोघांची कोरोना चाचणी पाॅजीटीव्ह आली असल्याने आम्ही वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालो आहोत@BJP4Maharashtra
१/३— Abhimanyu Pawar (@AbhiPawarBJP) July 8, 2020
दरम्यान मला हलकासा ताप/खोकला जाणवत असल्याने मी व माझ्या कुटुंबीयांनी कोरोना चाचणी केली होती .मी व माझा मुलगा परिक्षीत आम्हा दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याने आम्ही वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालो आहोत लातूरमधील आरोग्य व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच लातूर येथेच पुढील उपचार घेण्याचा मी निर्णय घेतला आहे. आम्हा दोघांचीही तब्येत उत्तम असून काळजीचे काहीही कारण नसून मागच्या चार-पाच दिवसात माझ्या वा परिक्षीतच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःला होम क्वारंटाईन करुन घ्यावे. तसेच खबरदारी म्हणून कोरोना चाचणीही करुन घ्यावी असंही पवार यांनी म्हटलं आहे.
होम क्वारंटाईन करून घ्यावे तसेच खबरदारी म्हणून कोरोना चाचणीही करून घ्यावी.
काही महत्त्वाचे काम असल्यास मी मेसेजच्या माध्यमातून उपलब्ध आहे. आपण सर्वांनीच स्वतःची व कुटुंबियांची काळजी घ्यावी. तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने लवकरच बरा होऊन जनसेवेत रूजू होईल असा विश्वास आहे.
३/३— Abhimanyu Pawar (@AbhiPawarBJP) July 8, 2020
COMMENTS