कार अपघातात भाजप आमदारासह सुरक्षा रक्षक आणि चालकाचा जागीच मृत्यू !

कार अपघातात भाजप आमदारासह सुरक्षा रक्षक आणि चालकाचा जागीच मृत्यू !

उत्तर प्रदेश  उत्तर प्रदेशातील सितापूरमध्ये कार अपघातात भाजपच्या आमदारासह त्यांचे सुरक्षा रक्षण आणि कार चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भाजप आमदार लोकेद्र सिंह चौहान यांचा या अपघातात मृत्यू झाला असून बुधवारी सकाळी हा अपघात झाला आहे. बिजनौरच्या नूरपूरमधून भाजपमधून ते निवडून आले होते.

गाडीवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान नियंत्रण सुटल्यामुळे लोकेंद्र यांची कारची धडक एका ट्रकला बसली. या जोरदार धडकेत ट्रक चालकाचाही मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. त्यामुळे या अपघातात मृत्यूची संख्या आता चारवर पोहचली आहे.

 

 

COMMENTS