एकनाथ खडसेंची चौकशी करा, विद्यमान आमदाराच्या बनावट लेटरहेडवरुन मागणी !

एकनाथ खडसेंची चौकशी करा, विद्यमान आमदाराच्या बनावट लेटरहेडवरुन मागणी !

मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची चौकशी करण्याची मागणी विद्यमान आमदाराच्या बनावट लेटरहेडवरुन करण्यात आली आहे. भाजप आमदार सुरेश भोळे यांच्या लेटरहेडचा गैरवापर करण्यात आला असून एकनाथ खडसे यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी यासह खडसेंच्या विविध प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

दरम्यान उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती यांना हे पत्र पाठविण्यात आले असल्याची माहिती आहे. याबाबत आमदार भोळे यांनी  पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली असून याबाबत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच आपल्या लेटरहेडचा गैरवापर करण्यात आला असून यामध्ये एकनाथ खडसे यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ही गोष्ट अत्यंत गंभीर असल्यामुळे याची तात्काळ चौकशी करण्याची मागणी आमदार भोळे यांनी पोलिसांकडे केली आहे.

 

COMMENTS