मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजप आमदारानं भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आज राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे.लाड हे विधान परिषदेचे आमदार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जातात. ही भेट राजकीय नसल्याचं लाड यांनी म्हटलं आहे. आपले आणि राज ठाकरे यांचे पूर्वीपासूनच चांगले संबंध आहेत. वारंवार आमच्या भेटी होत असतात. त्यात राजकारण नाही असं लाड म्हणाले आहेत.
Mumbai: Bharatiya Janata Party MLC, Prasad Lad, met Maharashtra Navnirman Sena chief, Raj Thackeray at the latter's residence, earlier today. #Maharashtra pic.twitter.com/spPdfLSDkE
— ANI (@ANI) August 12, 2019
दरम्यान आगामी विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाड आणि राज ठाकरे यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. तसेच राज ठाकरे हे गेल्या काही वर्षांपासून भाजपवर सातत्याने टीका करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय. तर मनसे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत सामील होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे याबाबत आता राज ठाकरे काय भूमिका घेणार याबाबत चर्चा रंगली आहे.
COMMENTS