डेहराडूण – कोणताही राजकीय पक्ष आमदारांची बैठक विविध कारणांसाठी बोलवत असतात. पण भाजपनं त्यांच्या आमदारांची बैठक चक्क पक्ष निधी गोळा करण्यासाठी आणि त्याचं नियोजन करण्यासाठी बोलावली होती.
भाजपच्या उत्तराखंड प्रदेशअध्यक्षांनी काल आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये पक्ष निधी गोळा करण्यासाठी काय करयाचे ? निधी कसा आणि कुणाकडून गोळा करायचा याबाबतच्या सूचना आमदारांना देण्यात आल्या. आजीवन सह्योग निधी या नावाखाली पक्षासाठी निधी गोळा करण्यात येणार आहे. येत्या 26 तारखेपर्य़ंत 25 कोटी रुपयांचा पक्ष निधी गोळा करण्याचं उदीष्ट ठेवण्यात आलंय. सर्व आमदारांना निधी गोळा करण्यासाठी ठरावीक निधीचं टार्गेट दिल्याची चर्चा आहे. मात्र उघडपणे आमदार याविषयी बोलत नाहीत.
Uttarakhand: BJP calls meeting of its MLAs in Dehradun to discuss 'Aajiwan Sahyog Nidhi' to collect funds for the party, MLAs say 'we have not been given a target as such but we have assured that we will be able to collect a fund of Rs 25 Crore by 26th January'. pic.twitter.com/FQHB4WgVHt
— ANI (@ANI) January 18, 2018
COMMENTS