भर सभेतच भाजपच्या आमदार आणि खासदारामध्ये जोरदार हाणामारी ! VIDEO

भर सभेतच भाजपच्या आमदार आणि खासदारामध्ये जोरदार हाणामारी ! VIDEO

नवी दिल्ली – भाजपचे आमदार आणि खासदारामध्ये जोरदार हाणामारी पहायला मिळाली आहे. उत्तर प्रदेशमधील संत कबीरनगर जिल्ह्यात भाजपच्या नत्यांमध्ये ही हाणामारी झाली आहे. एका प्रकल्पाच्या शिलान्यासात आपलं नाव नसल्याबद्दल भाजप खासदार शरद त्रिपाठी यांनी भाजप आमदार राकेश सिंह यांना जाब विचारला होता. यामुळे राकेश सिंह भडकले आणि त्यानंतर या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांनी वाद हा वाद सोडवला.  जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा प्रकार घडला आहे.   एकाच पक्षातील नेत्यांमध्ये हा वाद झाल्यामुळे विरोधकांना आयतं कोलीत मिळालं असल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादीन याबाबतचा व्हिडीओ शेअर केला असून गुंडा पार्टीचा आँखोदेखा हाल अशी जोरदार टीका भाजपवर केली आहे.

 

COMMENTS