भाजप आमदाराचेच सरकारवर घोटाळ्याचे गंभीर आरोप !

भाजप आमदाराचेच सरकारवर घोटाळ्याचे गंभीर आरोप !

नागपूर – आतापर्यंत विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले असल्याचं आपण पाहिलं असेल परंतु भाजप आमदारानंच आपल्या सरकावर घोटाळ्याचे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मराठवाड्यात कोट्यवधींचा डांबर घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे. सध्याचे रस्ते सचिव सी.पी. जोशी हे घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचं प्रशातं बंब यांनी म्हटलं आहे.

दरम्यान याबाबत आमदार प्रशांत बंब यांनी काही अधिकाऱ्यांची अप संपदा चौकशी व्हावी यासाठी तक्रार केली होती. यानंतर एसीबीने प्रथम दर्शणी तक्रारीत तथ्य असल्याचे सांगत, बांधकाम खात्याला अधिकाऱ्यांची  चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र बांधकाम खातं अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची परवानगी देत नव्हती, बंब यांनी याबाबत 28 तक्रारी केल्या होत्या, आणि 90 आठवण पत्र ही पाठवले होते, मात्र त्याला काहीही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर बंब यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. त्यानंतर आज खंडपीठाने बांधकाम विभागाला आणि एसीबीला नोटीस पाठवली असून चौकशीला का परवानगी देत नाहीत, याची विचारणा केली आहे.

काय आहे घोटाळा ?

2010 ते 2017 पर्यंत प्रशांत बंब यांनी चौकशी केली असून यामध्ये डांबराची खोटी बिलं लावण्यात आली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यामध्ये कोट्यवधींचे डांबर खरेदी करण्यात आले असून  HPCL  या कंपनीची डांबराची खोटी बिलं लावली आणि डांबरचे पैसे उचलले आहेत. तसेच   पैसे उचलून रस्तेच केले नाहीत, यामुळं अनेक रस्ते झाले नसल्याचा दावा प्रशातं बंब यांनी केला आहे.

COMMENTS