नागपूर – जमीन संपादनात शेकडो कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजप आमदारअनिल गोटे यांनी केला आहे. धुळे आ़णि नंदुरबार जिल्ह्य़ातील राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित होण्या-या आदिवासींच्या जमीनी लाटून शेकडो कोटींचा अपहार केला असल्याचं गोटे यांनी म्हटलं आहे. काही राजकीय नेते आणि वरीष्ठ अधिकार्यांचे रॅकेट असून धुळे जिल्ह्यात काही राजकीय नेत्यांनी आदिवासी जमिनी किरकोळ भावात खरेदी केल्या आणि त्या जमीनींचा भूसंपादन विभागाकडून कोट्यवधी रुपयांचा मोबदला खिशात घातला असल्याचा गंभीर आरोप अनिल गोटे यांनी केला आहे.
दरम्यान दिनेश भिल्ल या आदिवासीच्या जमीनीचे 2 कोटी 91 लाख मिळाले त्यातले 40 हजार त्या आदिवासीला दिले, उरलेले राजकीय नेते आणि अधिकार्यांनी खिशात घातले असल्याचं अनिल गोटे यांनी म्हटलं आहे. तसेचअशा पद्धतीने शेकडो एकर जमिनीत अपहार करण्यात आला असून धुळे शहरातील नॉटरी, बँक अधिकारी, महसूल अधिकारी ,नेते यांचं हे रॅकेट असल्याचं त्यांनी सभागृहात म्हटलं आहे. तसेच चंद्रकांत पाटील, अजित पवार आणि अनिल गोटे याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रीय महामार्ग कलकत्ता ते अहमदाबाद आणि अहमदाबाद ते हैद्राबाद या महामार्गांसाठी भूसंपादन सुरू असून याबाबत सचिव दर्जाच्या वरीष्ठ अधिकार्यांची नियुक्ती करून चौकशी करण्याचे आश्वासन सरकारनं विधानसभेत दिले आहे.
COMMENTS