सांगली – पक्षात साधू-संन्यास्यांना सर्वोच्च स्थान, त्यांचं राजकारणात काय काम ? असा सवाल करत भाजप आमदार विलासराव जगताप यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. राजकारणात चांगल्या गुणांना वाव राहिलेला नाही. सोलापूर मतदारसंघात भाजपचे सिद्धेश्वर स्वामी निवडून आले आहे. त्यांचे राजकारणात काय कम आहे. तसेच हे स्वामी लोक राजकारणात का येत आहेत ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान एवढेच नाहीतर सोलापूर मतदारसंघात पराभूत झालेले काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर त्यांनी स्तुतीसुमने उधळली आहेत. भाजप आमदार असलेले विलासराव जगताप यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता विलासराव जगताप यांच्यावर पक्षाकडून आता काय कारवाई केली जाणार हे पाहण गरजेचं आहे.
COMMENTS