मुंबई – गडचिरोलीतील हल्ल्यासाठी काँग्रेस जबाबदार असल्याचं ट्वीट कर्नाटकमधील चिकमंगळूर येथील भाजपाचे आमदार सी. टी. रवी यांनी केलं आहे. गडचिरोलीमध्ये झालेल्या भ्याड नक्षली हल्ल्यात आपले शूर जवान शहीद झाले. शहीद जवानांसाठी मी प्रार्थना करतो. छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेत आल्यापासून देशद्रोह्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. त्यांना शोधून कठोर शिक्षा द्यायला हवी’ असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
Naxal attack in Gadchiroli that martyred our Brave Soldiers is a cowardly act executed by Barbarians.
I pray for Our Martyrs. The return of CONgress in Chattisgarh has given a new life to the Anti-Nationals. They should be mercilessly hunted down & given the harshest punishment.
— Chowkidar C T Ravi 🇮🇳 ಸಿ ಟಿ ರವಿ (@CTRavi_BJP) May 1, 2019
दरम्यान महाराष्ट्र दिनाच्या दिवशी नक्षलवाद्यांनी गडचिरोलीतील कुरखेडाजवळ बुधवारी भूसुरुंग स्फोट घडवला होता. त्यात शीघ्रकृती पथकाचे (क्यूआरटी) १५ जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यानंतर आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरु झाले असल्याचं दिसत आहे.
भाजपाचे आमदार सी. टी. रवी यांनी केलेल्या या ट्वीटमुळे आता राजकीपण तीपलं असल्याचं दिसत आहे.
COMMENTS