भाजप आमदाराच्या घरावर अंदाधुंद गोळीबार आणि ग्रेनेड हल्ला !

भाजप आमदाराच्या घरावर अंदाधुंद गोळीबार आणि ग्रेनेड हल्ला !

नवी दिल्ली – भाजप आमदाराच्या घरावर बुधवारी मध्यरात्री अंदाधुंद गोळीबार आणि ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपाचे वादग्रस्त आमदार संगीत सोम यांच्या उत्तर प्रदेशमधील मीरत येथील घरावर हा हल्ला झाला आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी हा हल्ला केला आहे. घरावर अंदाधुंद गोळीबार करत हँड ग्रेनेडही फेकण्यात आले आहेत.या हल्ल्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून आमदार सोम हे सुरक्षित आहेत. जो ग्रेनेड फेकण्यात आला होता. त्याचा स्फोट न झाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

दरम्यान याबाबत आमदार सोम यांनी प्रतिक्रिया दिली असून या हल्ल्याबाबत आपल्याला कोणत्याही प्रकारचा धमकीचा फोन आला नाही. परंतु दोन वर्षांपूर्वी माझ्या घरावर ग्रेनेड हल्ला करु अशी धमकी देण्यात आली होती. असं त्यांनी म्हटलं आहे. घटनास्थळी रिकामी काडतुसे आणि भिंतीवर गोळीबाराचे निशाण आढळून आले असून फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरु आहे. एक हँड ग्रेनेडही जप्त करण्यात आले आहे.दरम्यान वादग्रस्त वक्त्यामुळे आमदार सोम हे अनेक वेळा चर्चेत आले असून त्यांना झेड श्रेणीची सुरक्षा दिली जाते.

 

COMMENTS