भाजपला धक्का, आणखी एका आमदाराचा राजीनामा !

भाजपला धक्का, आणखी एका आमदाराचा राजीनामा !

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का बसला असून भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी राजीनामा दिला आहे. गोटे यांनी विधानसभा सभापतींकडे आपला राजीनामा सोपवला आहे. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून आमदार गोटे नाराज होते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती आहे.

दरम्यान भाजपाविरोधात लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे. आपण आजही मोदीचे समर्थक असून आपला केवळ मोदींच्या नावाने वाईट उद्योग करणाऱ्यांना विरोध असल्याचे गोटे यांनी सांगितले. तसेच गोटे यांनी गिरीश महाजन यांच्यावर देखील गंभीर टीका केली आहे. पक्षातील राजकारणाचा कंटाळा आल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS