बीड – बीड जिल्ह्यातील केजच्या आमदार संगिता ठोंबरे यांच्या अडचणीत वाढ झाली असून संगिता ठोंबरे यांच्यासह त्यांचे पती विजय प्रकाश ठोंबरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. बनावट स्वाक्षरी करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत.
आमदार संगिता ठोंबरे प्रवर्तक आणि त्यांचे पती अध्यक्ष असलेल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे सहकारी मागासवर्गीय सुतगिरणीच्या संचालक मंडळावरील व्यक्तीच्या तक्रारीवरुन हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे विथानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं दिसत आहे.
दरम्यान गनपती कांबळे या व्यक्तीचं नाव सुतगिरणीच्या संचालक मंडळावर असून त्यांच्या विविध प्रस्तावांवर बनावट सह्या करुन सरकारकडून निधी लाटल्याचा आरोप कांबळे यांनी पोलिसांकडे केला होता. तसेच फॉरेन्सिक हस्ताक्षर तज्ञांनी सुतगिरणीच्या विविध कागदपत्रांवरील गनपती कांबळेंची स्वाक्षरी खोटी असल्याचा निर्वाळा दिला आहे. त्यांच्या बनावट सह्या करताना गनपतीऐवजी ‘गणपती’ असा ऊल्लेख करण्यात आला होता. यावरुन सर्व प्रकरण समोर आलं आहे.§
COMMENTS