नवी दिल्ली – मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये भाजप आमदारानं केलेल्या वक्तव्यामुळे देशभरातून टीका केली जात आहे. भाजप आमदार सुदर्शन गुप्ता यांनी हे वक्तव्य केलं असून बलात्कार झाल्याची घटना घडल्यानंतर पिडीतेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी रुग्णालयात भारतीय जनता पक्षाचे खासदार सुधीर गुप्ता आले असता, त्यावेळी तिथे उपस्थित असलेले आमदार सुदर्शन गुप्ता यांनी पिडितेच्या कुटुंबियांना खासदारांना धन्यवाद म्हणायला सांगितले. हे कुटंब दुःखात असताना सुदर्शन गुप्ता यांनी त्यांना आधार देण्याऐवजी त्यांनाच धन्यवाद देण्याचं वक्तव्य केल्यामुळे देशभरातून टीका केली जात आहे.
दरम्यान सुदर्शन गुप्ता यांना बलात्कारापेक्षा ‘नमस्कार’ महत्त्वाचा वाटत आहे का असा सवाल राजकीय वर्तुळातून केला जात आहे. मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये 7 वर्षांच्या लहान मुलीबर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना पूर्वनियोजित असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. शाळेत जाणाऱ्या लहान मुलींवर नजर ठेऊन हे कृत्य करण्यात आले आहे. या घटनेने पुर्ण देशाला हादरवून टाकले असून, दोषींना फाशी देण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. अशातच भाजप आमदारानं केलेल्या या कृत्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
COMMENTS