प्रत्येक हिंदू जोडप्याने कमीत कमी 5 मुलांना जन्म द्यावा – भाजप आमदार

प्रत्येक हिंदू जोडप्याने कमीत कमी 5 मुलांना जन्म द्यावा – भाजप आमदार

भाजपचे आमदार, खासदार किंवा पदाधिकारी कुठल्या ना कुठल्या वादात सतत असतात. आता भाजपच्या एका आमदारनं असंचं एक वादग्रस्त विधान केलं आहे. प्रत्येक हिंदू जोडप्यानं कमीत कमी 5 मुलांना जन्म द्यावा असं वक्तव्य भाजपचे आमदार सुरेंद्र सिंग यांनी केलं आहे. हिंदूंची लोकसंख्या वाढली पाहिले. प्रत्येक हिंदू जोडप्याने कमीत कमी 5 मुलांना जन्म दिला तरच भारताचा दबदबा कायम राहिल आणि देशात हिंदुत्व टिकून राहिल असंही सिंग यांनी म्हटलं आहे. सिंग हे उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील बरिया या मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत.

सिंग यांनी यापूर्वी अशीच वादग्रस्त विधानं केली होती. जिना हे कायम भारत विरोधी होते आणि त्यांना भारताबद्दल कधीच प्रेम नव्हतं असंही सिंग म्हणाले होते. जिन्नांना दहशतवादी म्हणणार नाही कारण ते काही काळ देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते असंही सिंग म्हणाले होते. सककारी अधिका-यांपेक्षा वेश्यांचं चारित्र्य चांगलं असल्याचंही सिंग म्हणाले होते. वेश्या पैसे घेऊन निदान त्यांचं काम करतात, मात्र अधिकारी पैसे घेऊनही काम करत नाही असं सिंग म्हणाले होते.

COMMENTS