सांगली – भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ उडाली आहे.
भाजपाचे ओळखपत्र दाखवल्यास टोल नाक्यावर टोल घेतला जात नाही. कारण त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि आपला फोटो असतो असा गौप्यस्फोट आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला आहे.मेळाव्यात काही कार्यकर्त्यांनी भाजपाचं ओळखपत्र दाखवूनही टोल नाक्यावर टोलमाफी दिली जात नसल्याची तक्रार केली. यावर उत्तर देताना सुरेश हाळवणकर यांनी हे वक्तव्य केलं आहे. सांगलीतील मेळाव्यात ते बोलत होते.
दरम्यान या मेळाव्यात काही कार्यकर्त्यांनी आपल्याकडील भाजपचे ओळखपत्र दाखवली. त्यावेळी हे ओळखपत्र टोलनाक्यावर चालत नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण ओळखपत्रावर चंद्रकांत पाटील आणि आपला फोटो असल्या कारणाने टोल नाक्यावरील कर्मचारी काही तरी समस्या निर्माण होऊ शकते, आपला टोल काढून घेतला जाऊ शकतो असा विचार करतात. आमदार, नेते आणि काही कार्यकर्ते गेले म्हणून काय होतं असा विचार करुन ते सोडून देतात”.असंही हाळवणकर यांनी म्हटलं आहे.
COMMENTS