नवी दिल्ली – एका भाजप आमदारानं महिला अधिकाय्राला धमकावलं असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. उदयभान चौधरी असं या भाजपा आमदाराचं नाव असून उप-विभागीय दंडाधिकारी गरिमा सिंह यांना त्यांनी धमकावलं आहे.तुम्हाला माहिती नाही का मी आमदार आहे ? तुम्हाला माझी ताकद कळली नाही का ? लोकशाहीची ताकद कळली नाही का ?’, अशा शब्दांत उदयभान चौधरी धमकावत असल्याचं व्हिडीओत स्पष्ट ऐकू येत आहे.
#WATCH Agra: BJP MLA Udaybhan Chaudhary threatens SDM Garima Singh, says 'Don't you know I am an MLA? Don't you realize my power, the power of democracy?' He had gone to meet the SDM over farmer issues (17.12.18) pic.twitter.com/3lfTlXAi46
— ANI UP (@ANINewsUP) December 18, 2018
दरम्यान उदयभान चौधरी हे फतेहपूर-सिकरीचे आमदार असून आग्रा येथील शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी ते उप-विभागीय दंडाधिकाऱ्यांकडे गेले होते. त्यावेळी त्यांनी या महिला अधिकाय्राला धमकावलं आहे. तसेच उदयभान चौधरी यांनी आपल्या वक्तव्याचं समर्थन करत माफी मागण्याची कोणतीही गरज नसल्याचं म्हटलं आहे. उप-विभागीय दंडाधिकारी लोकांचं गाऱ्हाणं ऐकून घेत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. परंतु गरिमा सिंह यांनी उदयभान चौधरींचे सर्व आरोप फेटाळले आहेत.
COMMENTS