भाजप आदाराच्या मुलीची भन्नाट लग्नपत्रिका !

भाजप आदाराच्या मुलीची भन्नाट लग्नपत्रिका !

उत्तराखंड – उत्तराखंडमधील भाजप आमदाराच्या मुलीची भन्नाट लग्नपत्रिका पहायला मिळाली आहे. या लग्नपत्रिकेवर चक्क राज्य सरकारचा लोगो छापण्यात आला आहे. भाजपचे आमदार सुरेश राठोड यांनी हा पराक्रमक केला आहे. त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नपत्रिकेवर सरकारचा लोगो छापल्यामुळे राज्यभरात जोरदार चर्चा सुरु आहे.

 

 

सुरेश राठोड हे हारिद्वारच्या ज्वालापूर मतदार संघाचे आमदार असून त्यांनी आपल्या दत्तक  कन्येच्या लग्नपत्रिकेत चक्क उत्तराखंड सरकारचा लोगो वापरला आहे. त्यामुळे यावरुन विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला आहे.विशेष म्हणजे, यावरुन स्पष्टीकरण देताना सुरेश राठोड यांनी हा आपला हक्क असल्याचा दावा केला आहे. परंतु भाजप आमदाराच्या या कृतीवरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसने सुरेश राठोड यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

COMMENTS