नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कर्नाटकध्येही भाजपनं काँग्रेस-जेडीएसचं सरकार पाडलं.परंतु मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार पाडण्याची धमकी देणाऱ्या भाजपला मुख्यमंत्री कमलनाथ यांनी चांगलाच दणका दिला आहे. कारण भाजपमधील दोन आमदारांनी काँग्रोसमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे आमदार नारायण त्रिपाठी आणि शरद कौल यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान आज दंड विधी संशोधन विधेयकावर
भाजपचे आमदार नारायण त्रिपाठी आणि शरद कौल यांनी काँग्रेस सरकारच्या बाजूने मतदान केलं. त्यामुळे काँग्रेसला 122 मतं पडली आणि भाजपला धक्का बसला. या दोन्ही आमदारांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेससोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु आता आम्हाला घरी परत यायचं असल्याचं या दोन्ही आमदारांनी म्हटलं आहे.
COMMENTS